दिव्यांग सेना आणि सामाजिक संघटना, कोल्हापूर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : दिव्यांग सेना आणि सामाजिक संघटना, कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गरजू दिव्यांगांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यात शालेय साहित्य वाटप, शिधावाटप यांसारख्या उपक्रमांचा समावेश असतो. यंदा या संघटनांनी एका नवीन उपक्रमाचे आयोजन केले होते. २०२५ या वर्षात जिल्हा परिषद शाळेत पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या कुमार विद्यामंदिर, वाशी येथील विद्यार्थ्यांना आणि कन्या विद्यामंदिर, वाशी येथील विद्यार्थिनींना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी दिव्यांग सेना व सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष सुमित शिंदे, शाखाध्यक्ष गुलाब लोखंडे उपस्थित होते. तसेच, कुमार शाळेचे मुख्याध्यापक कारंजकर सर व वर्गशिक्षक पोवाळे मॅडम आणि कन्या शाळेचे मुख्याध्यापक सर व वर्गशिक्षक सुतार मॅडम यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली असून, दिव्यांग सेना आणि सामाजिक संघटना, कोल्हापूर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.