तामगावात DMR फाउंडेशनच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गौमातेचे भक्तीमय स्वागत!

तामगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील पाटील (पंढरे) कुटुंबीयांनी तामगाव येथील DMR फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्राला गौमाता दान केली आहे. भक्तीमय वातावरणात या गौमातेचे केंद्रात स्वागत करण्यात आले.
यावेळी केंद्राचे संस्थापक रणजित दुर्गुळे यांनी सांगितले की, “आजपासून आपल्या केंद्रात गौमाता स्वामी समर्थ सेवेत दाखल झाली आहे. आता स्वामींबरोबर गौमातेचेही नित्य पूजन होईल आणि हे सेवेचे भाग्य आपल्या सर्वांना लाभेल.” तसेच, केंद्रातील सर्व सण मोठ्या आनंदात या गौमातेसोबत साजरे केले जातील आणि सर्व पूजाविधींमध्ये गौमातेचा सहभाग असेल असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी सर्व स्वामीभक्त आणि महिलांनी गौमातेला ‘स्वामींनी’ असे नाव देऊन तिचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.
यावेळी DMR फाउंडेशन (ट्रस्ट) च्या अध्यक्षा मीनाक्षी दुर्गुळे, उपाध्यक्षा संगीता पाटील, सेक्रेटरी मालती सावंत, खजिनदार वर्षा सुर्वे, संचालक रंजना खराडे, शैला मंडे, नम्रता देसाई, भावना तटकरे, रुपाली शिंदे, अश्विनी काटकर यांची उपस्थिती होती. केंद्राचे कार्याध्यक्ष अनिल खामकर, खजिनदार युवराज देसाई, अजय देसाई, जितेश तटकरे, रितेश नरुटे, समर्थराज दुर्गुळे, साईराज दुर्गुळे आणि सर्व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवराज देसाई यांनी सर्वांचे आभार मानले, तर कार्याध्यक्ष अनिल खामकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.