गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतील ६५ विद्यार्थ्यांना इस्रो सफरीची संधी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापुरातील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीमार्फत घेण्यात आलेल्या ‘गुरुकुल प्रज्ञाशोध’ परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या ६५ विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथील सफरीची अनोखी संधी मिळाली आहे. नुकतेच हे सर्व विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना झाले.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रज्ञाशोध परीक्षेला महाराष्ट्रभरातून ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या मोठ्या सहभागातून निवडक ६५ हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचे बक्षीस म्हणून इस्रोसारख्या प्रतिष्ठित संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी मिळाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या महत्त्वपूर्ण प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महादेवरावजी महाडिक हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हे विद्यार्थी इस्रोकडे रवाना झाले, जे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.