गांधीनगर ग्रामपंचायतीत लोकराजे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी!

गांधीनगर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीमध्ये आज लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती सरपंच संदीप पाटोळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शाहू महाराजांनी समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले कार्य, शिक्षण सर्वांसाठी खुले करणे आणि जातीभेद निर्मूलनासाठी उचललेली पाऊले यावर त्यांनी विस्तृत विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार निवास तामगावे यांनी मानले. या जयंती सोहळ्याला ग्रामपंचायत कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.