आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश; गगनबावडा आगाराला १० नवीन एसटी बसेस!

धुंदवडे (विलास पाटील) : राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्यावतीने महामंडळाकरिता नवीन बसेस घेण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. त्या अंतर्गत आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून गगनबावडा आगाराला 10 बसेस मंजूर झाल्या आहेत, त्यापैकी 5 बसेस उपलब्ध झाल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा गगनबावडा बस स्थानक येथे पार पडला.
महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचे पर्व सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून गगनबावडा तालुक्याला 5 बसेस मिळाल्या व उर्वरित 5 बसेस देखील लवकरच येतील उपलब्ध होतील.
याप्रसंगी बोलताना “गगनबावडा येथील आगार व एसटी स्टँड त्याचे देखील नूतनीकरण लवकरच केले जाईल या ठिकाणी अद्ययावत असे एसटी स्टँड, प्रवाशांना राहण्याची सोय आदी सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच माझ्या आमदार फंडातून तालुक्यात विविध ठिकाणी बस स्टॉप देखील मंजूर करून दिले जातील”, अशी ग्वाही यावेळी दिली.
पर्यटन दृष्ट्या गगनबावडा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने आराखडा तयार झाला असून गगनबावडा तालुक्यात रोजगार निर्मिती करणे येथील लोकांचे उत्पन्न वाढवणे, हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे.
या मंजूर झालेल्या बसेस योग्य नियोजन लावावं अशा सूचना दिल्या. उर्वरित बसेस ही लवकरच उपलब्ध करून देईन अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी , जेष्ठ नेते पी. जी. शिंदे ,नंदू पोवार , गोकुळचे संचालक . अजित नरके, माजी सभापती एकनाथ शिंदे, लहू गुरव, स्वप्नील शिंदे, दादू पाटील, आनंदा पाटील, ए बी पाटील, राजाराम पाटील, राघु पाटील, सरपंच मानसी कांबळे,उपसरपंच संतोष गावडे व सर्व सदस्य ग्रामपंचायत यांच्यासह पांडुरंग पाटील, संतोष पाटील, समीर तांबोळी,शशांक पारगावकर ,पी.आर.चौगले, संजय पोतदार, युवराज कदम, नारायण पाटील, बाजीराव गुरव, प्रदिप पाटील इंद्रजीत मेंगाने, यशवंत जाधव, केरबा पाटील, सुनील पडवळ,संजय पडवळ, संतोष पाटील, तिसंगिचे सरपंच सर्जेराव पाटील तसेच ST महामंडळाचे संतोष बोगरे, यशवंत कानतोडे, जगदाळे मॅडम आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद प्रभुलकर यांनी केले.आभार पांडुरंग पाटील यांनी मानले .