भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सीपीआर रुग्णालयातील सुरक्षा जवानांना रेनकोट वाटप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरीत भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सीपीआर रुग्णालयात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ६० जवानांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते हे रेनकोट प्रदान करण्यात आले.
धनंजय महाडिक युवा शक्ती समाजात नेहमीच विविध उपयुक्त उपक्रम राबवत असते. सामाजिक बांधिलकी जपून अनेक गरजू घटकांना मदतीचा हात दिला जातो आणि आजचा हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. पावसाळ्याच्या दिवसांत मिळालेल्या या रेनकोटमुळे महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, प्रशासकीय अधिकारी अजय गुजर, डॉ. नवज्योत देसाई, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी विश्वासराव कदम, बंटी सावंत, किरण सूर्यवंशी, महादेव पाटील यांच्यासह सुरक्षा बलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.