महाराष्ट्र ग्रामीण
बेकायदेशीर दारू विक्री;गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन मध्ये एकावर गुन्हा दाखल!

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत (सलीम शेख ) : आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात दारू विक्री बंद (ट्राय डे) असतानाही, बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये छापा टाकला.
या छाप्यात शगुन सदाशिव टिंगळे (वय २९, रा. शिवनाकवाडा, ता. शिरोळ) याला मोपेडच्या डिकीमध्ये दारूच्या बाटल्या ठेवून बेकायदेशीरपणे विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ७३ हजार ८७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलिस सहायक फौजदार पवार करत आहे.