महाराष्ट्र ग्रामीण

आमदार महाडिकांची शेतकऱ्यांशी थेट संवाद: ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ अभियानांतर्गत वसगडे व हलसवडे येथे भेट!

सांगवडेवाडी (इमरान मुल्ला ) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमातून आमदार अमल महाडिक आणि अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी वसगडे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून कृषी क्षेत्रातील विविध पैलूंवर चर्चा केली.
या भेटीदरम्यान, सागर मोरे आणि कुसुम मोरे यांच्या शेताला भेट देऊन कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आलेल्या भुईमूग बियाण्यांची माहिती घेण्यात आली. तसेच, सीआरए तंत्रज्ञानानुसार फळांच्या झाडांच्या लागवडीची पाहणीही करण्यात आली. यावेळी इको कंपनीमार्फत ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, जे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याचे उत्तम उदाहरण होते.


चर्चेदरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी पीक विमा, महावितरण, महसूल आणि पाणंद रस्त्यांशी संबंधित विविध तक्रारी मांडल्या. या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करण्यात येईल, असे आश्वासन आमदार महाडिक आणि अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले.
याच कार्यक्रमांतर्गत, आमदार महाडिक आणि अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी हलसवडे येथील महिलांच्या समूह शेती प्रकल्पालाही भेट दिली. या प्रकल्पाची माहिती घेऊन त्यांनी महिलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या भेटीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचल्या असून, त्यांच्या निराकरणासाठी पावले उचलली जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button