दख्खन चिकन ट्रेडर्सचा पाचवा वर्धापन दिन, शाळेला वॉटर फिल्टर भेट!

सिद्धनेर्ली (सलीम शेख ) : येथील दख्खन चिकन ट्रेडर्स नदीकिनारा यांनी नुकताच आपला ५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. गेली पाच वर्ष दख्खन चिकन ट्रेडर्स सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत आहे, आणि यावर्षीही त्यांनी समाजोपयोगी कार्य करत आपला वर्धापन दिन साजरा केला.
या वर्षीच्या वर्धापन दिनानिमित्त, दख्खन चिकन ट्रेडर्सने विद्यामंदिर नदी किनारा, सिद्धनेर्ली येथील शाळेची गरज ओळखून तेथे वॉटर फिल्टर बसवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. यासोबतच, वर्धापन दिनाचे औचित्य साधून दख्खन चिकन ट्रेडर्सने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही केले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका, कॉम्रेड शिवाजी मगदूम, दख्खन चिकन ट्रेडर्सचे मालक अक्षय पाटील, सुप्रिया पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. दख्खन चिकन ट्रेडर्सच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक सर्वच स्तरांतून होत आहे.