तळंदगे येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन!

हुपरी (सलीम शेख ) : हातकणंगले तालुक्यातील तळंदगे गावाच्या हद्दीत, संग्राम यादव यांच्या “सरकार मळा” नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेताजवळील ओढ्यात काल (दि. ९ जुलै) सकाळी १०.३० वाजण्यापूर्वी अंदाजे ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत हुपरी पोलिसांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील समीर आझम मुल्लाणी (वय ४२, रा. तळंदगे) यांनी हुपरी पोलिसांना दिली. मृतदेह वेवारस स्थितीत असून, त्यावर माशा बसलेल्या होत्या व दुर्गंधी येत होती. त्यामुळे मृतदेह काही दिवसांपासून तेथेच असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
मृताचे वर्णन:
* अंदाजे वय ४० वर्षे
* उंची अंदाजे ५ फूट ७ इंच
* बांधा मध्यम
* निळसर रंगाची ट्रॅक पँट परिधान केलेली
* डाव्या हातावर बदामचे गोंदण असून त्यात इंग्रजीमध्ये “DS” असे लिहिलेले आहे.
हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर वरील वर्णनाचा कोणताही इसम हरवला असेल किंवा आपल्या पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असेल, तर तात्काळ हुपरी पोलीस ठाण्याशी दुरध्वनी क्रमांक ०२३० – २४५०३३ वर किंवा तपास अधिकारी पोसई कोळपे यांच्या ९५४५४८९९८३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.