महाराष्ट्र ग्रामीण
ओम शिव गोरक्ष योगी गोरक्ष धाम सरनोबतवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!

सरनोबतवाडी (सलीम शेख ) : सरनोबतवाडी येथील ओम शिव गोरक्ष योगी गोरक्ष धाम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त नाथपरंपरा सामुदायिक प्रार्थना, महा अभिषेक आणि महाआरती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मठाधिपती यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य भक्तगण आणि शिष्यगण उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर नाथ परंपरेनुसार विधीवत पूजा आणि आरती करण्यात आली. या सोहळ्यामुळे परिसरात अत्यंत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.