महाराष्ट्र ग्रामीण
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी नांदणी येथील जिनसेन मठाला दिली भेट

नांदणी (सलीम शेख ) : गोकुळ दूध संघाचे संचालक आणि माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी नांदणी येथील जिनसेन स्वस्तिश्री जैन मठामध्ये जाऊन मठाधिपती जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान, डॉ. मिणचेकर यांनी मठाधिपतींना ‘महादेवीला परत आणण्यासाठी’ एकत्रितपणे लढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. मिणचेकर यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील आणि हिंगणगावचे सरपंच दीपक पाटील उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.