कोल्हापूरला उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला मंजुरी मिळाल्याने गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील आरपीआय (गवळी गट) पक्षातर्फे साखर आणि पेढे वाटून मोठा आनंद साजरा करण्यात आला!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला यश मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ऐतिहासिक क्षणाची नोंद भारताचे नवनियुक्त न्यायमूर्ती भूषण गवळी यांच्या ठाम भूमिकेमुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला मंजुरी मिळाली. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत या जिल्ह्यांतील लोकांना प्रत्येक सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जावे लागत होते. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होत होता. या निर्णयामुळे पक्षकारांची होणारी ससेहोलपट थांबणार असून, वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवळी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचे आरपीआय (गवळी गट) च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
गोकुळ शिरगाव येथे जल्लोष
या महत्त्वपूर्ण निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे आरपीआय (गवळी गट) चे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संघटक बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी साखर आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. या प्रसंगी विलास मोहिते (हिंदू एकता कोल्हापूर शहर अध्यक्ष), महेश शिंदे (कनेरी), विनोद चव्हाण, राहुल पाटणकर, वसंत दुर्गुडे, धनाजी यादव, शामराव भोसले, प्रमोद बेलेकर, धनाजी मोरे, राहुल भोसले, महादेव मोरे, सुरेश जिर्गे, मिलिंद पाटील, सुधाकर पाटील, दौलत पाटील, प्रदीप पाटील, सागर मगदूम, उत्तम बोडके, रामा मोरवाळे, प्रशांत पाटील, मारुती संकपाळ, सर्जेराव ढाले, कृष्णात वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्किट बेंचमुळे न्यायव्यवस्था लोकांच्या अधिक जवळ पोहोचेल अशी आशा व्यक्त करत, आरपीआय (गवळी गट) च्या कार्यकर्त्यांनी न्यायमूर्ती भूषण गवळी यांचे आभार मानले.