महाराष्ट्र ग्रामीण

जयसिंगपूर श्री दत्त पतसंस्थेत ७.५६ कोटींचा अपहार, १० जणांवर गुन्हा दाखल!

जयसिंगपूर (सलीम शेख) : जयसिंगपूर येथील श्री दत्त शासकीय व निमशासकीय सेवकांची पतसंस्था मर्यादित, जयसिंगपूर येथे तब्बल ७ कोटी ५६ लाख ५६ हजार ११७ रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी संस्थेचे चेअरमन, संचालक, मॅनेजर, शाखाधिकारी आणि कर्जदार अशा एकूण १० जणांवर ४ ऑगस्ट रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पतसंस्थेमध्ये ३ नोव्हेंबर २०१४ ते २१ मार्च २०२५ या काळात पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप, बेकायदेशीर गुंतवणूक आणि रोख रकमेचा गैरवापर केल्याचं समोर आलं आहे. यामुळे संस्थेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळत नसल्यामुळे त्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील आणि उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी २०१४ ते २०२३ या कालावधीचं पुन्हा लेखापरीक्षण केलं. या तपासणीत ७.५६ कोटी रुपयांच्या अपहाराची बाब उघडकीस आली.
संशित आरोपी:
* अनिलकुमार महादेव तराळ
* प्रमोद मनोहर जाधव
* बाळासो दत्तू लोहार
* श्रीमती रेखा महादेव तराळ
* अनिल बाळासो घोलप
* रावसाहेब भूपाल कोळी
* श्रीमती वैशाली अनिलकुमार तराळ
* कै. महादेव भाऊ तराळ
* राजीव गणपत कोळी
* इंद्रजीत महादेव जाधव
हा अहवाल मिळाल्यानंतर सहाय्यक निबंधक उर्मिला राजमाने यांनी देशमुख यांना पोलिसात फिर्याद देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचं वातावरण असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button