कागल शहरातील धोकादायक झाडांची छाटणी!

कागल (सलीम शेख) : कागल शहरातील गुरुवार पेठ भाजी मंडईमधील अंदाजे १०० वर्षांपूर्वीची धोकादायक झाडे नगरपालिकेने काढली आहेत. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई करण्यात आली.
ही झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळे ती इमारती आणि भाजी मंडईवर झुकलेली होती, ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर नगरपालिकेने ३० ते ३५% प्रमाणे ही झाडे छाटण्याचा निर्णय घेतला. काही झाडांच्या फांद्या इमारतींवर पडण्याची भीती असल्यामुळे ती संतुलित करणे आवश्यक होते.
नगरपालिकेचे कर्मचारी बादल कांबळे यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण करण्यात आले. वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी कामाच्या वेळेत काही बदलही करण्यात आले होते. या कामामुळे नागरिकांनी नगरपालिकेचे कौतुक केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.