कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांचे शिरोलीत स्वागत!

कोल्हापूर, शिरोली (सलीम शेख) : महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), सहकार तथा गृहनिर्माण राज्यमंत्री पंकजजी भोयर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान शिरोली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी स्वरूप महाडिक यांनी आमदार अमल महाडिक यांच्या परिवाराच्यावतीने राज्यमंत्री भोयर यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळमातोश्री मंगलताई महाडिक,शौमिका महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ग्रीष्मा महाडिक भेट घेतली.
या भेटीच्या निमित्ताने स्थानिक विकास, सहकार क्षेत्रातील संधी, तसेच ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनांबाबत चर्चा झाली. राज्यमंत्री भोयर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि स्थानिक नेतृत्वाशी संवाद साधला.या भेटीमुळे शिरोली परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये विकासाबाबत नव्या अपेक्षा जागृत झाल्या आहेत.