कोल्हापूर फर्स्ट चा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असलेल्या कोल्हापूर फर्स्ट या संघटनेचा प्रथम पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी भूषवले, तर प्रमुख उपस्थितीत खासदार छत्रपती शाहू महाराज, हातकणंगलेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचा समावेश होता.
कार्यक्रमात कोल्हापूर फर्स्ट चे नवनियुक्त पदाधिकारी चेअरमन: सुरेंद्र जैन , उपाध्यक्ष: अँड. सर्जेराव खोत, डॉ. अमोल कोडोलीकर, प्रताप पाटील, सचिव: बाबासो कोडेकर ,सहसचिव: उज्वल नागेशकर, सीएस जयदीप पाटील,खजिनदार: सीएस पद्मसिंह पाटील ,सहखजिनदार: सीए नितीन हरगुडे
या समारंभाला कोल्हापूरमधील अनेक नामांकित उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर फर्स्ट च्या माध्यमातून कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव अबाधित ठेवत, नव्या पिढीसाठी आधुनिक आणि प्रगतिशील कोल्हापूर घडवण्याचा संकल्प करण्यात आला.