महाराष्ट्र ग्रामीण
सर्व कागल हद्दीतील पोलीस पाटलांसाठी महत्त्वाची सूचना

कागल (सलीम शेख) : गणेशोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने, कागल पोलीस ठाणे आणि कागल यांच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता कागल येथील कोर्टाजवळ असलेल्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणार आहे.
या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी, सुजितकुमार क्षिरसागर आणि तहसीलदार, अमरदीप वाकडे हे उपस्थित राहणार आहेत.
पोलीस पाटील यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, इतर प्रतिष्ठित व्यक्ती आणि डॉल्बी मालक-चालक यांना या बैठकीसाठी आवर्जून सोबत घेऊन यावे. सर्व पोलीस पाटलांनी स्वतः या बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
पोलीस निरीक्षक, कागल यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.