कागलमध्ये ब्रह्मकुमारी बहिणींच्या हस्ते रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न!

कागल (सलीम शेख ) : प्रजापती ब्रह्मकुमारी सेवाकेंद्राच्या बहिणींनी कागल येथील आसिफ मुल्ला प्रेमी ग्रुप आणि परिसरातील शेकडो नागरिकांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधली. हा रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी बहीणजींनी उपस्थित सर्वांना एक विशेष प्रकारची राखी बांधली. रक्षाबंधन केवळ भाऊ-बहिणीचा सण नसून, या निमित्ताने परमात्म्याशी नाते जोडून भक्तीमार्ग धारण करावा, असे आवाहन त्यांनी केले. परमात्म्याशी जोडले गेल्याने शांती, प्रेम आणि समृद्धीचा अनुभव येतो, असे त्या म्हणाल्या. ही राखी बांधून आत्म्याचे परमात्म्याशी घट्ट नाते जोडून जीवन सार्थक करावे, असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या बोलण्याने उपस्थित नागरिक प्रभावित झाले.
या कार्यक्रमात आसिफ मुल्ला, प्रमोद कदम, संतोष आंबी, महादेव घाटगे, मिरासो शेख, विशाल पाडेकर, आण्णा गोरडे, सलीम शेख, आनंदा कुईगडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.